Join us

जॉन अब्राहमनंतर 'ड्रामा क्वीन'लाही कोरोनाची लागण; एकता कपूरचा कोविड रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:24 IST

Ekta kapoor: एकता कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करत तिला कोविड झाल्याची माहिती दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचं सावट आहे. आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या विषाणूची लागण झाली असून अनेकांना त्यांचे प्राणही गमवावे लागले आहेत. अलिकडेच करीना कपूर खानने कोविडवर मात केली होती. त्यानंतर नुकतीच अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला कोरोना झाल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे जॉननंतर आता छोट्या पडद्यावरील ड्रामा क्वीन एकता कपूर ( Ekta Kapoor) हिलादेखील कोरोना झाला आहे.

एकता कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करत तिला कोविड झाल्याची माहिती दिली आहे. सोबतच मी सुरक्षित आहे आणि घरीच स्वत:ला क्वारंटाइन केलं. तुम्हीही काळजी घ्या असं आवाहन तिने केलं आहे.

"सगळ्या प्रकारची काळजी घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या माझी प्रकृती व्यवस्थित आहे. पण या काळात जे माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोविड चाचणी करुन घ्या", अशी पोस्ट एकताने शेअर केली आहे.

दरम्यान, अलिकडेच जॉन अब्राहमला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूरला, अंशुला कपूर यांनादेखील कोविड झाल्याचं समोर आलं होतं. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याएकता कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडटेलिव्हिजन