Join us

विद्या बालन आजवर शाहरुख खानची हिरोईन का झाली नाही? अभिनेत्रीने सांगितलं कारण; म्हणाली -

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:48 IST

अभिनेत्री विद्या बालन तिच्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीत शाहरुखानसोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली नाही. यावर अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. 

Vidya Balan:बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) सध्या 'भूलभूलैया-३' (Bhool Bhoolaiyya 3) या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलंय. अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले त्याशिवाय बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे. सध्या भूलभुलैया-३ च्या प्रमोशनसाठी विद्या बालन वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसतेय. यादरम्यान तिने आजवर हिंदी चित्रपटांमध्ये शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत कधीच पाहायला मिळाली नाही. यावर अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

नुकतीच विद्या बाललने 'झुम टीव्ही' ला दिलेल्या मुलाखतीत ती आजवर चित्रपटांमध्ये शाहरुखानसोबत लीड रोलमध्ये  पाहायला का मिळाली नाही? यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "मी शाहरुखसोबत 'हे बेबी', 'ओम शांती ओम' या चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण त्यात माझा त्याच्याबरोबर अगदी छोटासाच रोल होता. त्याची सहकलाकार म्हणून मी कधीच कोणता चित्रपट केला नाही". 

पुढे विद्या बालनने सांगितलं, "शाहरुखसोबत काम करण्याची माझी मनापासून इच्छा आहे, पण आतापर्यत अशी कोणती स्क्रिप्ट माझ्यासमोर आली नाही. ज्यामध्ये आम्ही दोघंही मुख्य भूमिकेत दिसू. मला वाटतं की वाटतं एके दिवशी असं नक्कीच घडेल". दरम्यान, या मुलाखतीत विद्या बालनने किंग खानसोबत  रोमॅंटिक चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

टॅग्स :विद्या बालनशाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटी