Tara Sutaria New Home: मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं सर्वसामान्यासह प्रत्येकाचं स्वप्न असतं. शिवाय प्रत्येकजण आपल्या परीने त्यासाठी प्रयत्न करत असतो. एखादा सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस प्रत्येकाचं हे स्वप्न असतं. अशातच लोकप्रिय बॉलिवू़ड अभिनेत्री तारा सुतारियाचं नव्या घराचं स्वप्न साकारं झालं आहे. नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
तारा सुतारिया हे नाव प्रेक्षकांना काही नवं नाही. स्टुडंट ऑ द इअर या चित्रपटातून ताराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करिअरमधील पहिल्याच चित्रपटाने तिला प्रचंड स्टारडम मिळवून दिला.तारा अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल गोष्टींमुळे देखील चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्रीच्या तिच्या नव्या घरामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे."नवीन सुरुवात...", असं सुंदर कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या पहिल्यावहिल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
प्रशस्त हॉल,आकर्षक इंटिरिअर असलेलं ताराचं घर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या नव्या घरात पहिलं पाऊल ठेवलं आहे. या नवीन घरात ताराने खास सजावट केली आहे. ताराने नवं घर घेतल्याने तिच्या चाहत्यांसह हिंदी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी शुभेंच्छांचा वर्षाव केला आहे.
Web Summary : Actress Tara Sutaria fulfilled her dream of owning a home in Mumbai. She shared a glimpse of her new house with an elegant hall and interior design on social media, receiving congratulations from fans and celebrities.
Web Summary : अभिनेत्री तारा सुतारिया ने मुंबई में अपना घर होने का सपना पूरा किया। उन्होंने सोशल मीडिया पर एक सुरुचिपूर्ण हॉल और इंटीरियर डिजाइन के साथ अपने नए घर की एक झलक साझा की, जिससे प्रशंसकों और मशहूर हस्तियों से बधाई मिली।