Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे. 'आशिकी २', 'हैदर' आणि 'एबीसीडी-२' यांसारख्या चित्रपटातून अभिनेत्री नावारुपाला आली. बॉलिवूडची ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यासह चित्रपटांमुळे अनेकदा चर्चेत येते. दरम्यान, श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'हसीना पारकर' हा चित्रपट २०१७ साली आला होता. अंडरवर्ल्डच्या सानिध्यात वाढलेल्या हसीनाच्या जीवनपटलावर हा चित्रपटात आधारित होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर हसीना पारकरच्या भूमिकेत दिसली होती. परंतु श्रद्धा कपूरपूर्वी हा हसीना पारकरचा रोल अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ऑफर झाला होता. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.
'शूट आऊट अॅट लोखंडवाला', 'एक अजनबी','जंजीर' असे चित्रपट दिग्दर्शित करणारे डायरेक्टर अपूर्व लाखिया यांनी हसीना पारकर च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. पण, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. या चित्रपटात हसीनाचा प्रवास 'गॉडमदर' आणि 'गँगस्टर'पर्यंत येऊन कसा थांबला याचं प्रभावी चित्रण पाहायला मिळालं.
'या' कारणामुळे सोनाक्षी सिन्हाने नाकारला सिनेमा
मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अपूर्व लखियाने हसीना पारकरमधील मुख्य भूमिकेसाठी सर्वप्रथम सोनाक्षी सिन्हाची निवड केली होती. मात्र, त्यावेळी सोनाक्षी इत्तेफाक चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त होती. त्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला आणि या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरला कास्ट करण्यात आलं.