Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी नतमस्तक, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:45 IST

शिल्पा शेट्टीने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले.

 बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही फिल्म इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे,  ज्यांनी स्वतःच्या बळावर यश मिळवलं आहे.  शिल्पा शेट्टी कायमच चर्चेत असते. शिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी संपर्कात असते. आता अभिनेत्रीचे काही फोटो समोर आले आहेत आणि तेही थेट साईबाबांच्या शिर्डीतून. शिल्पा शेट्टीने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईभक्‍त असलेली  शिल्पा अनेकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असते. 

नुकतेच रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' मध्ये ती झळकली आहे. वेबसिरीजच्या मोठ्या प्रतिसादानंतर शिल्पा शेट्टी साईबाबांचे आशिर्वाद घेण्यासाठी शिर्डीत पोहचली. शिल्पा शेट्टीने शिर्डीत आल्यानंतर श्री साईचरणी नतमस्तक मंदिरात पूजा केली. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'विश्वास आणि धैर्यानं त्याच्या चरणी. ओम साई राम'. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

शिल्पा शिर्डीत पोहोचली असताना तिला पाहण्यासाठी साई मंदिरातील भाविकांनी आणि तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली. शिल्पा शेट्टी शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून, ती वर्षातून किमान एकदातरी साईदर्शनासाठी आवर्जून शिर्डीत येते. शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तिनं ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सिरीजमधून डिजिटल विश्वात पदार्पण केलं. तर याआधी ती ‘सुखी’ या चित्रपटात सुखविंदर उर्फ सुखी कालरा या 38 वर्षीय पंजाबी गृहिणीच्या भुमिकेत पाहायला मिळाली.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटीबॉलिवूडशिर्डी