Join us

VIDEO: अभिनयासह शिल्पा शेट्टीचं फिटनेसलाही प्राधान्य; लाडक्या लेकीला देतेय योगाचे धडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:25 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनयासह फिटनेसमुळेही चर्चेत येत असते

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या अभिनयासह फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. शिल्पाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.  ९०च्या दशकात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी शिल्पा शेट्टी आजही तितकीच लोकप्रिय आहे. ४८व्या वर्षीही शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. शिल्पा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

शिल्पाने नुकताच सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची लाडकी लेकही सोबत असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये मायलेकी योगा करताना दिसत आहेत. 

व्हायरल व्हिडीओनूसार अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या मुलीला योगाचे धडे देत आहे. व्हिडीओमध्ये मायलेकीचा बॉण्ड पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. "The balancing act, Mommy - Daughter Yoga time" असं कॅप्शन देत शिल्पाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शिल्पा तिची मुलगी समिशाला वृक्षासन तसेच भुजंगासन करत आहेत. चिमुकलीची योगा करण्याची पद्धत पाहून नेटकरी देखील थक्क झाल्याचं पाहायला मिळतंय. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया