Rasha Thaani: ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि अदाकारिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन (Raveena Tandon). रवीनानंतर आता तिची लेक आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. रवीनाची लेक राशा (Rasha Thadani) तिच्या 'आझाद' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. राशा या चित्रपटामध्ये अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. अलिकडेच राशा तिच्या 'उई अम्मा' या गाण्यामुळे चर्चेत होती. त्यात आता सोशल मीडियावर राशा थडानीचा आझादच्या सेटवरील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये राशा सेटवर अभ्यास करताना दिसते आहे.
सोशल मीडियावर राशा थडानीच्या आझाद चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राशा तिच्या व्हॅनिटीव्हॅनमध्ये शूटसाठी तयार होत असताना अभ्यास करत असल्याची पाहायला मिळतेय. व्हिडीओमध्ये एकीकडे हेअर स्टाईलिस्ट राशाच्या केसांची स्टाईल करतोय तर आणि मेकअपमॅन तिचा मेकअप करतो आहे. तर राशा थडानी आरशासमोर बसून अभ्यास करते आहे. पण, जेव्हा राशाला तू काय करते आहेस असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर उत्तर देत राशा म्हणते- "मी अभ्यास करत आहे. माझ्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यासाठी माझ्या हातात फक्त १० दिवस शिल्लक आहेत आणि भूगोल माझा पहिला पेपर आहे." राशाच्या या व्हिडीओवर नेटकरी तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत.
२०२४ मध्ये 'सिंघम अगेन', 'शैतान' सारख्या सिनेमांमध्ये काम केल्यावर अजय देवगणचा नवीन वर्षातील हा पहिला सिनेमा आहे. 'आझाद' चित्रपटात अजय देवगण, राशा तडानी,अमन देवगण यांच्यासह अभिनेत्री डायना पेंटी, पियुश मिश्रा या कलाकारांचीही सिनेमात खास भूमिका आहे. १७ जानेवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.