Munjya Movie Sequal: आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' (Munjya) सिनेमा ७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.या भयपटाची तेव्हा प्रचंड चर्चा झाली होती.अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. कॉमेडी एंटरटेनमेंटचं पॅकेज असलेला 'मुंज्या' सर्वांना आवडला. त्यानंतर बराच काळ या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल चर्चा रंगू लागली होती. अशातच या चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. मुंज्याच्या सीक्वलमध्ये प्रेक्षकांना फ्रेश चेहरा दिसणार असल्याची झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, मुंज्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये प्रेक्षकांना नवा चेहरा दिसण्याची शक्यता आहे. लापता लेडीज फेम अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. दरम्यान, 'मुंज्या-२' मध्ये अभिनेत्री प्रतिभा रांटाची चित्रपटात एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचंही सांगण्यात येतंय.त्यामुळे या चित्रपटातून शर्वरी वाघ पाहायला मिळणार नाही का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.'मुंज्या २'च्या कथेला आणखी रंजक बनवण्यासाठी चित्रपटात नवी व्यक्तिरेखा जोडण्यात आली आहे.शिवाय तिच्या पात्राचं कनेक्शन पहिल्या भागाशी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
माहितीनुसार, 'मुंज्या-२' चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना काय वेगळं पाहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.