Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड अभिनेत्रीने केलं कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण, दोन चित्रपटांची लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 16:39 IST

संजय दत्तही एका कन्नड सिनेमात दिसणार आहे.

आपल्या डान्सने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री नोरा फतेहीला लॉटरी लागली आहे. नोराला आगामी दोन कन्नडसिनेमांमध्ये दिसणार आहे. एका सिनेमात ती सुपरस्टार ध्रुव सारजासोबत दिसणार आहे. तसंच यामध्ये खलनायकाच्या भूमिके संजय दत्तची वर्णी लागली आहे. ही एक पॅन इंडिया फिल्म असणार आहे. 'केडी द डेविल' असं सिनेमाचं टायटल आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच आऊट झाला आहे.

'केडी द डेविल'च्या फर्स्ट लूकमध्ये नोरा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवणारा हा फर्स्ट लूक आहे. 1970 दशकातील बंगळुरूच्या सत्य घटनांवर आधारित सिनेमाची कहाणी ही पीरिअड अॅक्शन फिल्म असणार आहे.

नोरा फतेही आणि ध्रुव सारजाशिवाय सिनेमा शिल्पा शेट्टी, रमेश अरविंद आणि वी रवीचंद्रन देखील आहेत. केव्हीएन फिल्म्स सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहे.नोरा फतेही म्हणाली, "कन्नड चित्रपट उद्योगाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे सहकार्य नवीन प्रेक्षकांशी जोडण्याची आणि कर्नाटकातीच्या परंपरेचे विविध पैलू एक्सप्लोर करण्याची एक रोमांचक संधी आहे. मी प्रेक्षकांची वाट पाहत आहे त्यांचा प्रतिसाद कसा असेल हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.

टॅग्स :नोरा फतेहीकन्नडसिनेमा