Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शहरी बाबू' गाण्यावर अभिनेत्री मुमताज यांनी आशा भोसलेंसोबत धरला ठेका, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:42 IST

76 वर्षीय अभिनेत्री मुमताज यांचा डान्स, ९० वर्षीय आशा भोसले यांनीही केली सोबत

60 ते 70 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मुमताज (Mumtaz) दिवसेंदिवस चिरतरुणच होत आहेत याचा नुकताच प्रत्यय आला आहे. आशा भोसले यांच्यासोबत डान्स करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. ७६ वर्षीय मुमताज यांचा डान्स बघून नेटकरीही आश्चर्यचकित झालेत. स्वत: मुमताज यांनीच त्यांच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. 

हा एका घरातील गेट टुगेदरचा व्हिडिओ आहे. जिथे मागे काही लोक व्हिडिओ काढत आहेत तर समोर अभिनेत्री मुमताज या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासह ठेका धरत आहेत. मुमताज यांचाच सिनेमा 'लोफर' मधील आशा भोसलेंनीच गायलेलं लोकप्रिय शहरी बाबू गाण्यावर दोघीही नाचत आहेत. यामध्ये मुमताज या वयातही ज्या उत्साहाने आणि अगदी ग्रेसफुली नाचत आहेत हे बघून सर्वच अवाक झालेत. 

या आयकॉनिक अभिनेत्री-गायिका जोडीला त्यांच्याच जुन्या गाण्यावर एन्जॉय करताना पाहून सगळेच खूश झालेत. सोशल मीडियावर व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.'तुम्ही आजकालच्या अभिनेत्रींनाही मात देत आहात' अशी कमेंट एकाने केली आहे. 

टॅग्स :मुमताजआशा भोसलेनृत्यबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल