DDLJ MOVIE: प्रत्येक सिनेप्रेमीच्या मनात घर करुन बसलेलादिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा सिनेमा आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. शाहरुख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असलेला चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा हिंदी सिनेसृष्टीतील एक माईलस्टोन सिनेमा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटासह त्यांच्या भूमिकेचंही तितकंच कौतुक झालं. डीडीएलजे मध्ये राज-सिमरन यांच्या पात्रांसह चौधरी बलदेव सिंह,लज्जो, कम्मो कौर आणि धरमवीर मल्होत्रा या पात्रांनीही सिनेरसिकांच्या मनाच्या ठाव घेतला. मात्र, या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एक अभिनेत्री गायब होती. काय होतं कारण, जाणून घेऊया...
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमात अभिनेत्री हिमानी शिवपूरी यांनी कम्मो नावाची भूमिका साकारली होती. काजोलच्या आत्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचं शूट पूर्ण झालं मात्र क्लायमॅक्समध्ये हिमानी शिवपूरी दिसल्या नाहीत. अलिकडेच समाचार एजन्सीसोबत बोलताना त्यांनी यामागचं कारण सांगितलं. त्या म्हणाल्या, मी डीडीएलजेचं शूटिंग करत असताना त्यावेळी माझ्या पतीचं निधन झालं. मला त्या सीनबद्दल फारसं काही आठवत नाही, मला फक्त एवढंच माहित आहे की माझ्या पतीचे निधन झाले होते आणि मी शहरात एकटी होते.त्यानंतर फरीदाजी मला भेटायला आल्या आणि त्यांनी यश चोप्रा यांना संपूर्ण परिस्थिती सांगितली होती."
त्यानंतर हिमानी शिवपूरी म्हणाल्या, माझ्या पतीच्या निधनानंतर, मी पूर्णपणे खचले होते. मला अजिबात आठवत नव्हतं की मला सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंगसाठी दोन दिवस पनवेलला जावं लागेल. पण,त्यानंतर मला यश चोप्रा यांचा फोन आला ते म्हणाले, मी परिस्थिती समजू शकतो. त्यामुळे मी क्लायमॅक्स सीन करणं शक्य झालं नसतं हे ते समजू शकत होते. असा भावुक प्रसंग अभिनेत्री हिमानी यांनी पहिल्यांदा शेअर केला.
हिमानी शिवपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. चित्रपटांमध्ये कधी आई तर कधी मावशीच्या भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली.
Web Summary : Himani Shivpuri, known for her role in DDLJ, revealed she couldn't film the climax due to her husband's death. Yash Chopra understood her situation. She remembers being alone in the city during that difficult time.
Web Summary : 'डीडीएलजे' में अपनी भूमिका के लिए जानी जाने वाली हिमानी शिवपुरी ने खुलासा किया कि पति की मृत्यु के कारण वह क्लाइमेक्स की शूटिंग नहीं कर सकीं। यश चोपड़ा उनकी स्थिति को समझ गए थे। उन्हें उस कठिन समय के दौरान शहर में अकेले रहना याद है।