Ananya Pandey: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत येत असते. सध्या हिंदी सिनेसृष्टीत अनन्या स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करते आहे. आपले वडील चंकी पांडे (Chunky Pandey) यांच्या पावलावर पाऊल ठेवत ती देखील अभिनय क्षेत्रात नाव कमावते आहे. अनन्याने आजवर बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अशातच अनन्या पांडेने २०२२ मध्ये आलेल्या 'लायगर' या सिनेमात विजय देवरकोंडासोबत काम केलं होतं. बॉक्स ऑफिसवर सिनेमाला काही फारसं यश मिळालं नाही. परंतु 'लागयर'मध्ये काम करण्यास अनन्याचा नकार होता, असा खुलासा अभिनेत्रीचे वडील चंकी पांडे यांनी केला आहे.
अभिनेता चंकी पांडेने नुकतीच 'मॅशेबल इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने 'लायगर' सिनेमा दरम्यानचा किस्सा शेअर केला. चंकी पांडेच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदा चित्रपटाची ऑफर आल्यानंतर अनन्याने आपण यासाठी तयार नाही, असं म्हटलं होतं. याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, "जेव्हा तिने मला विचारलं की तिने हा चित्रपट करावा का, तेव्हा तिला वाटत होतं की ती यासाठी खूप लहान आहे. त्यावेळी ती मला म्हणाली, बाबा मी हे सगळं करण्यासाठी खूप लहान आहे. तेव्हा मी अनन्याला हा सिनेमा करण्याचा सल्ला दिला. कारण हा एक मोठा चित्रपट होता."
पुढे अभिनेता म्हणाला, "पण कदाचित तिचं म्हणणं बरोबर होतं. या सिनेमात काम करण्यासाठी ती खूपच लहान होती. त्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ होती." असं चंका पांडे यांनी सांगितलं.
अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने, 'स्टुडंट ऑफ द इयर- २' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'लायगर', 'काली पिली','पती पत्नी और वो', 'ड्रीम गर्ल-२' या चित्रपटातून काम करत आपला चाहतावर्ग निर्माण केला.