Join us

'सैयारा'ची भलतीच क्रेझ; अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरसोबत तुलना! अमिषा पटेल म्हणते..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:02 IST

'सैयारा'ची क्रेझ पाहून अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरबरोबर तुलना, अमिषा पटेल प्रतिक्रिया समोर; म्हणाली...

Ameesha Patel Reaction On Saiyaara:मोहित सुरी (Mohit Suri) दिग्दर्शित 'सैयारा' (Saiyaara) चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम पाहायला मिळते आहे. हा बहुचर्चित चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सैयारा हृदयस्पर्शी चित्रपट अजूनही प्रेक्षकांना भावत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अहान पांडे आणि अनीत पड्डाच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. प्रेमात हरवून टाकणाऱ्या या चित्रपटाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. अशातच आता प्रेक्षक 'सैयारा'ची तुलना आता 'कहों ना प्यार है' चित्रपटासोबत तसेच अहान पांडेची तुलना  हृतिक रोशन आणि रणबीर कपूर सारख्या सुपरस्टार्ससोबत करत आहे. यावर अभिनेत्री अमिषा पटेलने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, अलिकडेच अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या अधिकृत एक्स हँडलवर चाहत्यांसाठी 'आस्क मी एनीथिंग सेशन' घेतलं होतं. त्यादरम्यान, एका सोशल मीडिया यूजरने अभिनेत्रीला 'सैयारा' या चित्रपटाच्या यशाबद्दल आणि अहान पांडेची हृतिक रोशन आणि रणबीर कपूरशी केलेली तुलना याबद्दल विचारलं. "त्यावर उत्तर देताना अमिषा म्हणाली,  मी अजूनही हा चित्रपट पाहिलेला नाही, पण मी अहानला यासाठी शुभेच्छा देते. अहान एक नवीन अभिनेता म्हणून प्रॉमिसिंग वाटतोय. शेवटी 'बाप तो बाप आणि मुलगा हा मुलगाच असतो. आता लवकरच ऋतिक रोशन  'वॉर' च्या माध्यमातून काहीतरी वेगळं आणि हटके घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे." अशी प्रतिक्रिया देत अमिषाने तिचं मत मांडलं आहे. 

'सैयारा'ची बॉक्स ऑफिसवर धूम

सध्या बॉक्स ऑफिसवर सैयारा चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळतोय. अवघ्या सहा दिवासांतच चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटातील अहान आणि अनीतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतंय. 

टॅग्स :अमिषा पटेलबॉलिवूडमोहित सुरीसिनेमाहृतिक रोशन