Hemansh Kohli Video: अभिनेता हिमांश कोहली (Hemansh Kohli) 'यारियॉं' या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली. १० जानेवारी २०१४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) यांच्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. दरम्यान, अशातच अभिनेता हिमांश कोहलीबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हिमांशची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याने स्वत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत.
नुकताच हिमांश कोहलीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या प्रकृतीबाबत हेल्थ अपडेट शेअर केली आहे. सध्या हिमांश कोहलीची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, बऱ्याचे लोकांचे कॉल, मेसेज येत आहेत कारण मागील १५ दिवसांपासून मी कोणाच्याही संपर्कात नव्हतो. यामागे आरोग्यासंबंधित काही कारणं होती, या गोष्टी आपल्यासाठी अनपेक्षित असतात. गेले १०-१५ दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते, पण त्यातून मी आणखी स्ट्रॉंग झालो. यामध्ये बऱ्याच लोकांनी माझी साथ दिली. काही वेळेला मानसिकरित्या खचून गेलो होतो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांचे मी आभार मानतो. आज मला चांगलं वाटत आहे म्हणून तुमच्यासोबत बोलतो आहे."
यापुढे हिमांश म्हणाला, "याचदरम्यान मी कोणाशीच काही बोललो नाही. कारण मला असं वाटत होतं की दुसऱ्यांच्या नजरेत स्वत: चं महत्व कमी करुन घेणं. डॉक्टरांनी माझी फार उत्तम काळजी घेतली. म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे. या दिवसांमध्ये मला एक गोष्टीची जाणीव झाली की तुमच्या आरोग्या संबंधित काही समस्या असतील तर त्यांना गृहित धरु नका. तुम्ही मानसिक आणि शारिरिक दृष्ट्या सुदृढ असणं ही तुमची जबाबदारी आहे. याशिवाय तुम्ही काय खाता काय पिता तसंच कोणत्या गोष्टीचा विचार करता याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी, डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे मी लवकरात लवकर बरा होत आहे. थोडा कमकुवतपणा जाणवतो आहे पण मी लवकर बरा होईन. मला त्या प्रत्येकाचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला मदत केली. माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. जे काही घडतंय ते माझ्या भल्यासाठी होतंय, असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या आरोग्या संबंधित काही समस्या असेल तर गृहित धरु नका. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आमणि आशीर्वादामुळे माझ्या प्रकृतीत सुधारणा होतेय. असा हिमांशने सांगितलं.
वर्कफ्रंट
हिमांशने 'यारिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे 'जीना इसी का नाम है', 'बुंदी रायता', 'गहवारा', 'स्वीटी वेड्स NRI' अशा सिनेमांमधून हिमांशने त्याच्या अभिनयाची चुणुक दाखवली.