Join us

४० वर्षांची मैत्री! सतीश शाह यांच्या निधनानंतर जॉनी लिव्हर झाले भावुक, म्हणाले-"दोन दिवसांपूर्वीच आम्ही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:15 IST

"दोन दिवसांपूर्वीच आम्ही...", सतीश शाह यांच्या निधनानंतर जॉनी लिव्हर यांची पोस्ट, भावुक होत म्हणाले...

Johny Lever  Post: चित्रपटात कितीही छोटी भूमिका असली तरीही आपल्या विनोदीचं अचूक टायमिंग साधत ती भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आघाडीवर नाव असणारे अभिनेते सतीश शहा. दरम्यान, काल सतीश शहा यांचे वयाच्या 74 व्या वर्षी मुंबई येथे निधन झालं.शाह यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र,उपचारादरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. पडद्यावरील स्क्रीनटाइमची पर्वा न करता, प्रत्येक भूमिकेत जीव ओतून ती समरसतेने साकारण्याच्या त्यांच्या कौशल्याने त्यांना चित्रपटसृष्टीत ते लोकप्रिय झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 

दरम्यान, सतीश शाह यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील मंडळी तसेच कलाविश्वातील अनेक कलाकार शोक व्यक्त करीत आहेत. अशातच अभिनेते जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर दुःख व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की अभिनेत्याने दोन दिवसांपूर्वीच त्याच्याशी बोलणं केले होते.शहा यांच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय,"आपण एक महान कलाकार आणि आमच्या ४० वर्ष जुनी मैत्री असलेल्या प्रिय मित्राला गमावलं आहे. यावर माझा विश्वासच बसत नाही, कारण दोन दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं होतं. सतीश भाई, तुमची खूप आठवण येईल. चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील तुमचे अमूल्य योगदान कधीही विसरले जाणार नाही."अशी भावुक पोस्ट शेअर करत त्यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 

सतीश शाह यांचा जन्म २५ जून १९५१ रोजी  मांडवी, कच्छ, गुजरात येथील चित्रपटाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे शिक्षण झेवियर कॉलेजमध्ये पूर्ण केलं. अभिनेता बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफ. टी. आय. आय.) प्रवेश घेऊन अभिनयाचे प्रशिक्षण घेतलं. सतीश शाह यांच्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये 'अरविंद देसाई की अजीब दास्तान' या चित्रपटातून झाली, त्यानंतर 'गमन' (१९७९), 'उमराव जान' (१९८१), 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है' (१९८१) आणि 'शक्ती' (१९८२) या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Johnny Lever mourns Satish Shah's death, recalls 40-year friendship.

Web Summary : Johnny Lever expressed grief over Satish Shah's demise, highlighting their 40-year friendship. Lever fondly remembered their last conversation just two days prior. Shah, known for impactful roles, will be greatly missed.
टॅग्स :सतिश शहाजॉनी लिव्हरबॉलिवूडसेलिब्रिटी