सध्या संपूर्ण देश पहलगाम (pahalgam terror atack) येथे दहशतवाद्यांनी जो भ्याड केला त्याने हादरुन गेला आहे. या हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. याशिवाय काही जण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने ४९ वर्षांपूर्वी घडलेली अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. पहलगाममध्ये सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. सर्व कलाकार हॉटेलमध्ये पार्टी करत होते. आणि अचानक हॉटेलमध्ये दगडफेक आणि आगीचे बोळे फेकले गेले. ती घटना नेमकी काय होती? कोणासोबत असं घडलं होतं?
हॉटेलमध्ये आगीचे बोळे फेकले अन्
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत हा किस्सा घडला होता. 'कभी कभी' सिनेमाचं शूटिंग पहलगाम येथे सुरु होतं. त्यावेळी यश चोप्रा यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. ऋषी कपूर, नीतू कपूर आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते. सगळेजण एकत्र येऊन मस्ती करत होते. पण त्यांना बाहेर काय सुरु आहे, याचा अंदाज नव्हता. घोडागाडीचे मालक आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यात जोरदार भांडण झालं. एक ड्रायव्हर दारुच्या नशेत तावातावाने भांडत होता. हे भांडण इतकं वाढलं की, हजारो लोक जमा झाले.
संतप्त जमावाने रागाच्या भरात हॉटेलवर आगीचे बोळे फोकले. इतकंच नव्हे हॉटेलवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या मोठ्या गोंधळात हॉटेलमधील सर्व माणसं बेडखाली लपून बसली होती. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या मदतीने भारतीय सेनेने परिस्थिती नियंत्रणात आणली. याशिवाय ऋषी कपूर, नीतू कपूर आणि इतरांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आलं.