Kartik Aaryan:कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसाताना सुद्धा अभिनेत्याने इंडस्ट्रीत स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कार्तिक आर्यननेबॉलिवूड इंडस्ट्रीला बरेच सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 'प्यार का पंचनामा','भूल भुलैया २', 'भूल भुलैया ३', ‘सत्यप्रेम की कथा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. 'आशिकी-३' चित्रपटात तो लवकरच झळणार आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल खुलासा केला आहे.
नुकतीच कार्तिकने इंडियन एक्सप्रेसच्या 'स्क्रीन लाइव्ह' या इव्हेंटला हजेरी लावली. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "मुळात मी फार बोलत नाही. शिवाय मी ज्यांना ओळखतच नाही त्यांच्यासोबत जास्त बोलणंच होत नाही. कारण मी इथे मित्र बनवायला नाही तर काम करण्यासाठी आलो आहे. दर शुक्रवारनंतर माझे मित्र बदलतात."
'आशिकी-३' बद्दल दिली अपडेट
या शोमध्ये कार्तिक आर्यनने तो अनुराग बासू यांच्यासोबत लवकरच एका प्रोजेक्टमध्ये काम करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यावेळी कार्तिक म्हणाला, "ती एक रोमॅंटिक फिल्म आहे. आता माझा जो लूक आहे असाच लूक त्या चित्रपटामध्ये असणार आहे. या चित्रपटाचं शूट केव्हा सुरु होईल याची मी वाट बघतो आहे. "