Kartik Aaryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच त्याचा 'भुलभूलैय्या ३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावणारा कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. कार्तिकने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये बऱ्याच रोमॅंटिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामध्ये अभिनेत्याने रोमॅंटिक सीन्स देखील दिले आहेत. परंतु एक चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनची किसींग सीनमुळे डोकेदुखी वाढली होती. फक्त एका किसीन सीनसाठी त्याला ३७ रिटेक द्यावे लागले होते. याचा खुलासा अभिनेत्याने एका मुलाखतीत केला होता.
'फिल्मफेअर'मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिक आर्यनला 'कांची : द अनब्रेकेबल' या चित्रपटातील किसींग सीनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. सुभाष घई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 'कांची :द अनब्रेकेबल' एक रोमॅंटिक सीन करताना अभिनेत्याला फारच टेन्शन आलं होतं. त्यादरम्यान कार्तिक आर्यन म्हणाला, "मी कधी विचारच केला नव्हता की हा किसींग सीन माझ्यासाठी डोकेदुखीचं कारण ठरेलं. त्यादिवशी आमच्या वागण्यातही बदल झालेला मला जाणवला. एका सीनसाठी सुभाष घई यांनी आमच्याकडून ३७ टेक करून घेतले. जेव्हा ते ओके म्हणाले तेव्हा आम्ही प्रचंड खुश झालो."
पुढे अभिनेता म्हणाला, "असंही असेल कदाचित मिष्टीकडून त्यादिवशी चुका झाल्या असतील. सुभाष घई यांना तो सीन परफेक्ट पाहिजे होता. खरं सांगायचं झालं तर मला याबद्दल काहीच अनुभव नव्हता."