Join us

नऊ वर्षानंतर पुन्हा रिलीज होणार हर्षवर्धन राणेचा 'हा' रोमॅन्टिक सिनेमा; 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:38 IST

सध्या जुने चित्रपट रि-रिलीज करण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षकांची सुद्धा याला पसंती मिळताना दिसतेय.

Sanam Teri Kasam: सध्या जुने चित्रपट रि-रिलीज करण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षकांची सुद्धा याला पसंती मिळताना दिसतेय. 'ये जवानी है दिवानी' नंतर अलिकडेच रणवीर सिंगचा 'पद्मावत' थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता 'व्हेलेंटाइन डे' च्या  निमित्ताने काही रोमॅन्टिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) आणि अभिनेत्री मावरा होकेन यांची मुख्य भूमिका असलेला 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) हा सिनेमा पुन: प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेरसिकांच्या मागणीमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला 'सनम तेरी कसम' हा रोमॅन्टिक सिनेमा प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे. या चित्रपटातील इंदर आणि सुरु ची प्रेमकहाणी  अनेकांनी भावली. आजही या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. त्यातच आता हा चित्रपट रि-रिलीज करण्यात येणार असून सिनेरसिकांसाठी हा जणू मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे. येत्या ७ फेब्रुवारीला 'सनम तेरी कसम' पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेनसह मनीष चौधरी, मुरली शर्मा, अनुराग सिन्हा, विजय राज, सुदेश बेरी, कमल आदिब हे अनुभवी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर सुद्धा दमदा कामगिरी केली होती. 

टॅग्स :हर्षवर्धन राणेबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा