Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हि-मॅन'च्या नावात बदल; नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमातील क्रेडिटमध्ये दिलं नवीन नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 18:28 IST

सिनेसृष्टीत पदार्पण केल्याच्या तब्बल 64 वर्षांनंतर आता ऑनस्क्रीन त्यांनी नावात बदल केला आहे.

बॉलिवूडचे 'हि मॅन' (He-Man)म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) मोस्ट हँडसम अभिनेते म्हणून लोकप्रिय आहेत. 88 वर्षीय धर्मेंद्र अनेक वर्षांपासून काम करत आहेत. आताही नुकतेच त्यांचे दोन चित्रपट रिलीज झाले. 60 च्या दशकापासून ते सिनेइंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. आजही त्यांची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. त्यांची ओळख कायम धर्मेंद्र याच नावाने होते. तर त्यांची मुलं सनी आणि बॉबी आपल्या नावापुढे देओल आडनाव लावतात. पण आता धर्मेंद्र यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केल्याच्या तब्बल 64 वर्षांनंतर आता ऑनस्क्रीन त्यांनी नावात बदल केला आहे.

शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेननचा (Kriti Sanon) रोमँटिक कॉमेडी सिनेमा 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' नुकताच रिलीज झाला. यामध्ये धर्मेंद्र यांचीही भूमिका आहे. सिनेमाच्या क्रेडिट लिस्टमध्ये धर्मेंद्र यांचं नाव बदललेलं दिसतंय. 'धर्मेंद्र सिंह देओल' असं त्यांचं नाव देण्यात आलं आहे. 

धर्मेंद्र यांचं पूर्ण नाव धर्मेंद्र सिंह देओल असंच आहे. मात्र कायम त्यांनी केवळ धर्मेंद्र हे पहिलंच नाव सगळीकडे लावलं. याआधी त्यांनी कधीच नावाच्या पुढे-मागे काही लिहिलेलं नाही. आता ६४ वर्षांनी त्यांनी हा मोठा बदल केला आहे. अर्थात अद्याप धर्मेंद्र यांच्याकडून याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. मात्र सिनेमाच्या क्रेडिट लिस्टमध्ये हा बदल दिसून आला आहे. याआधी धर्मेंद्र आलिया भट आणि रणवीर सिंहच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसले. यामध्ये त्यांचा शबाना आजमींसोबत लिपलॉक सीन होता ज्याची खूप चर्चा झाली होती. 'तेरी बातो मे ऐसा उलझा जिया' सिनेमात धर्मेंद्र यांनी शाहीद कपूरच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. हा एक सायन्स फिक्शन रोमँटिक सिनेमा आहे. यामध्ये क्रिती सेनन रोबोट दाखवण्यात आली आहे तर शाहीद कपूर रोबोटच्याच प्रेमात पडला हे त्याला कळतं तेव्हा काय घडतं अशी सिनेमाची कहाणी आहे.

टॅग्स :धमेंद्रबॉलिवूडसिनेमा