Join us

"माझ्याऐवजी इतर कोणालाही...:", शाहिद कपूरने 'या' कारणामुळे सुपरहिट 'विवाह'मध्ये काम करण्यास दिलेला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:42 IST

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अमृता राव यांची मुख्य भूमिका असलेला 'विवाह' हा चित्रपट सुपरहिट ठरला.

Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अमृता राव यांची मुख्य भूमिका असलेला 'विवाह' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकुळ घातला होता. चित्रपटाची हृदयस्पर्शी कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. २००६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर सुरज बडजात्या यांनी विवाह चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. परंतु या चित्रपटातून आपल्याला काढण्यात यावे अशी विनंती चक्क शाहिद कपूरने सूरज बडजात्या यांना केली होती. याबद्दल अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये खास किस्सा शेअर केला होता. 

शाहिद कपूरने एका मुलाखतीमध्ये आपल्या संघर्षकाळावर भाष्य करत 'विवाह' चित्रपटादरम्यानच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी अभिनेता म्हणाला, "जेव्हा मी 'विवाह' सिनेमा करत होतो तो काळ माझ्यासाठी फारच वाईट होता. त्यावेळी लागोपाठ माझे तीन चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे या सिनेमाच्या बाबतीतही असं घडू नये हे मला वाटत होतं. त्यानंतर मी सूरज बडजात्यांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्याऐवजी इतर कोणालाही सिनेमात घेऊ शकता. "

पुढे अभिनेत्याने सांगितलं, "परंतु सूरज बडजात्या यांनी माझं म्हणणं ऐकलं नाही. त्यांचा माझ्यावर ठाम विश्वास होता. ते मला म्हणाले होते की, तू फक्त तुझं काम कर, बाकीच्या गोष्टींचा विचार करु नको. तो माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता. " असा खुलासा शाहिदने मुलाखतीत केला.

शाहिद कपूर सध्या 'देवा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आजवरची सर्वात वेगळी आणि भन्नाट भूमिका आहे.  या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी केलं आहे. शिवाय झी स्टुडिओ आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. 

टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा