Join us
Daily Top 2Weekly Top 5

संशयाच्या भूताने पछाडलं! बॉलिवूडच्या 'या' नायकाने प्रसिद्ध अभिनेत्रीला केलेली मारहाण? सहकलाकाराने सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:41 IST

बॉलिवूडच्या 'या' नायकाने प्रसिद्ध अभिनेत्रीला केलेली मारहाण? अभिनेत्रीच्या डोळ्यांना झालेली दुखापत, काय घडलेलं?

Deepak Parashar:बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान या ७० आणि ८० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये तेव्हाच्या बड्या स्टार्ससोबत काम केलं. त्यावेळी त्यांच्या कामाचं आणि सौंदर्याचं कौतुकही झालं. पण या अभिनेत्रीची तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाइफ चर्चेत राहिली. एकेकाळी झीनत अमान आणि अभिनेते दीपर पराशर यांच्या अफेअरचे किस्से बॉलिवूडमध्ये चांगलेच चर्चेत होते. या दोघांनी 'इन्साफ का तराजू' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवा जोर धरु लागल्या. यावर आता अभिनेते दीपर पराशर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अलिकडेच अभिनेते दीपक पराशर यांनी विकी लालवानी यांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. एक वेळ अशी होती जेव्हा झीनत यांचं  अभिनेते संजय खानसोबत नावं जोडण्यात आलं होतं. या मुलाखतीमध्ये दीपक यांनी झीनत अमान आणि संजय खान यांच्या नात्याबद्दलही खुलासे केले. त्याविषयी बोलताना ते म्हणाले,"जेव्हा मी झीनतला भेटलो तेव्हा ती त्या नात्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर होती. झीनत आणि मी खूप चांगले मित्र होतो. असा मित्र जो तिला रडण्यासाठी खांदा देऊ शकतो. आम्ही इन्साफ का तराजू सिनेंमाचं एकत्र  शूटिंग करत होता. त्यादरम्यान, संजय खान यांनी आमच्या नात्याचा चुकीचा अर्थ काढला.त्यांचा मोठा गैरसमज झाला."

मग पुढे त्यांनी सांगितलं,"एकेदिवशी सकाळी ११ वाजता झीनतला फोन आला आणि तिला भेटायला बोलावलं. पण त्यावेळी झीनत अमान फार बिझी होत्या. तिथे गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. झीनतला ढकलण्यात आलं आणि तिला मारहाण देखील झाली होती.नक्की काय घडलं होतं मला माहिती नाही. पण, झीनतने  राज साहेबांना सांगितलं होतं की तिला त्रास देण्यात आला."असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला. 

टॅग्स :झीनत अमानबॉलिवूडसेलिब्रिटी