Anupam Kher: अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ ते बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अनुपम खेर यांनी आजवरच्या त्यांच्या फिल्मी कारकिर्दीत ५०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनुपम खेर यांना आपण कधी गंभीर, कधी विनोदी तर कधी खलनायकी भूमिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अलिकडेच अनुपम खेर 'इमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आले होते. आता त्यानंतर ते पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. नुकतीच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर त्यांच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.
नुकतीच अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. अनुपम खेर लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या त्यांच्या आगामी सिनेमात ते साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनुपम खेर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 'Mythri Movie' प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दक्षिणेतील लोकप्रिय दिग्दर्शक हनुराव राघवपुडी यांच्याकडे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुपम खेर यांचा हा ५४४ वा चित्रपट आहे. दरम्यान, त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेच ते 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात ते जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत होते. शिवाय या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत होती. त्याचबरोबर अनुपम खेर 'विजय-69', 'द सिग्नेचर', 'कागज 2', 'द वॅक्सीन वॉर', 'द काश्मीर फाइल्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले.