Join us

बिग बींच्या 'दीवार' चित्रपटातील तो ब्रिज आठवतोय? मुंबईत आहे 'ही' जागा! कुठे आहे तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:59 IST

'दीवार' चित्रपटातील तो ब्रिज आठवतोय? 'ती' जागा कुठे आहे  माहितीये? प्रेक्षकांनी अचून हेरलेलं

Deewar Movie: बॉलिवूडचा ‘अ‍ॅग्री यंग मॅन अशी बिरुदावली मिरवणारे, सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या दमदार भूमिकांनी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन. शोले,दीवार, नमक हराम, अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. मात्र, दीवार हा सिनेमा त्यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. आजही सिनेरसिकांना यातील प्रत्येक संवाद तोंडपाठ आहेत. याच चित्रपटातील एक सीन आहे जिथे सुमित्रा देवी म्हणजे तिच्या मुलांसह रस्त्याच्या कडेला राहत असते. शिवाय काही भावनिक दृश्य याच पुलाच्या अगदी समोर चित्रित करण्यात आले आहेत.दीवारमधील तो ब्रिज नेमका कुठे आहे तुम्हाला ठाऊक आहे का?

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला  दीवार हा चित्रपट चांगलाच गाजला होता.१९७५ साली आलेला हा चित्रपट बिग बींच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटातील काही सीन्स हे  मुंबईतील प्रभादेवी स्टेशनजवळील पुलाखाली चित्रित केले गेले होते, असं सांगण्यात येतं. दीवार हा सिनेमा या ब्रिजमुळे चर्चेत आला होता. इतकी वर्ष होऊनही हा ऐतिहासिक ब्रिज अजूनही तसाच आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट अमिताभ बच्चननी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सांगितलं होतं.'त्या काळात 'शोले'चं  शूट पूर्ण करुन मग रात्रीच्या विमानाने मुंबईत येवून रात्री ‘दीवार’ सिनेमाचं शूट करत होतो,' असा खुलासा त्यांनी केला होता. 

अमिताभ बच्चन , शशी कपूर, निरुपा रॉय, सत्येन कपूर, नीतू सिंग,परवीन बाबी अशा कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५० वर्षांचा काल लोटला आहे. तरीही या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनशशी कपूरबॉलिवूडसिनेमा