Join us

'बडे मिया छोटे मिया' च्या सेटवर अक्षय कुमारच्या पायाला झाली होती दुखापत, ब्रेक न घेता पूर्ण केलं शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 14:45 IST

'बडे मिया छोटे मिया' च्या सेटवर खिलाडी कुमारच्या पायाला झाली होती दुखापत, ब्रेक न घेता अभिनेत्याने सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं. 

Bade Miyan Chote Miyan : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांचा आगामी चित्रपट 'बडे मिया छोटे मिया' मुळे चर्चेत आहेत. येत्या ११ एप्रिलपासून हा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

'बडे मिया छोटे मिया' या सिनेमाचं चित्रीकरण स्कॉटलॅंडमध्ये करण्यात आलं आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. एक अ‍ॅक्शन सीन शूट करताना अक्षय कुमारच्या पायाला दुखापत होऊन तो जखमी झाला होता. पण सिनेमाचं चित्रीकरण न थांबवत अभिनेत्याने हे शुटिंग पूर्ण केल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे अभिनेत्याच्या या व्हायरल फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायल मिळतंय. 

खिलाडी कुमारने 'बडे मिया छोटे मियां' या सिनेमामध्ये आपले स्टंट स्वत:चं केल्याचं सांगण्यात येत आहे. अबु धाबी, जोर्डन, स्कॉटलँड, ग्लासगो आणि यूके या देशांमध्ये या सिनेमाचं शूटिंग केलं गेलं आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला. त्यामुळे आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. 

या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या सोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, अलाया एफ आणि जुगल हंसराज यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारटायगर श्रॉफमानुषी छिल्लरजान्हवी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी