Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बाईकस्वाराने मला कानाखाली मारली..."; दुबईत अभिनेत्रीसोबत संतापजनक प्रकार, रडतच सांगितली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:28 IST

दुबईमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्रीला भररस्त्यात कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपला संताप आणि भीती व्यक्त केली आहे.

आपल्या बोल्ड अंदाज आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री खुशी मुखर्जी सध्या एका अनुभवामुळे हादरली आहे. दुबईमध्ये एका अज्ञात व्यक्तीने तिला भररस्त्यात कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, खुशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपला संताप आणि भीती व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये खुशी ढसाढसा रडताना दिसत असून तिने स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकी घटना काय?

खुशीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, रात्री ९ च्या सुमारास ती दुबईतील एका रस्त्यावरून जात असताना एका बाईकस्वाराने तिला गाठले आणि अभिनेत्रीला जोरात कानाखाली मारून तो पसार झाला. खुशी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, "मला समजत नाहीये मी काय करू. पोलीस स्टेशनला जाऊनही काय फायदा? रस्त्यावर कॅमेरेही नाहीत." व्हिडिओमध्ये ती वारंवार मागे वळून पाहताना दिसते. आपला कोणीतरी पाठलाग करतेय, असं खुशीला वाटतंय.

व्हिडिओसोबत खुशीने एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. तिने आरोप केला आहे की, काही लोक शरिया कायद्याचं पालन करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत आहेत. तिने स्थानिक पोलीस व्यवस्थेवरही ताशेरे ओढले आहेत. "पोलीस कोणतीही मदत करत नाहीत, स्टेशन रिकामे पडले आहेत. महिला अधिकारी देखील कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत'',असे खळबळजनक विधान तिने केले आहे.

खुशीने आपल्या पोस्टमध्ये भ्रष्ट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तिला सध्या कोणाचीही मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी खुशीने ''क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा. पण आता आमच्यात फार बोलणं होत नाही. मला माझं नाव त्याच्यासोबत जोडलेलं नकोय", असंही विधान केलं होतं. खुशीसोबत जो प्रकार घडलाय त्याविरोधात  पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Khushi Mukherjee Slapped in Dubai; Shares Ordeal, Fears for Safety

Web Summary : Actress Khushi Mukherjee was slapped in Dubai by a biker. She shared a tearful video, expressing fear and criticizing the police's inaction. She also alleged pressure to follow Sharia law and mentioned past interactions with cricketer Suryakumar Yadav.
टॅग्स :दुबईबाईकटेलिव्हिजनटिव्ही कलाकार