Join us
Daily Top 2Weekly Top 5

नातीवरचं प्रेम! 'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरची आजीने काढली नजर, भावुक करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:47 IST

जान्हवीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून आजी आणि नातीचं प्रेम दिसून येत आहे.

अनेक मालिकांमध्ये व्हिलन साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर 'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचली. बिग बॉसमुळे जान्हवीला विशेष लोकप्रियता मिळाली. यामुळे तिच्या चाहत्या वर्गातही मोठी भर पडली. जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. 

जान्हवीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून आजी आणि नातीचं प्रेम दिसून येत आहे. या व्हिडिओत जान्हवीची आजी तिची मीठ-मिरचीने नजर काढताना दिसत आहे. अभिनेत्रीचा आजीसोबतचा हा व्हिडिओ भावुक करणारा आहे. "माझी गोड आजी...तुम्ही गावी गेल्यावर तुमची आजी पण असंच करते का?", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. जान्हवीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, जान्हवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'आई माझी काळुबाई', 'जय जय स्वामी समर्थ', 'भाग्य दिले तू मला', 'अबोली' या मालिकांमध्ये ती दिसली होती. तर काही अल्बम साँगमध्येही तिने काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये जान्हवी सहभागी झाली होती. त्याबरोबरच या सीझनच्या टॉप ५ फायनलिस्टपैकी ती एक होती. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार