Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चांदीच्या ताटात पुरणपोळी, पुरणपोळीत जायफळ...", अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 17:23 IST

अमृता आणि प्रसाद लवकरच विवाहबंधनात अडकत आहेत. त्यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. 

सध्या कलाविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आप खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकली. बॉलिवूडप्रमाणे मराठी कलाविश्वातही लग्नाचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय जोडपं अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली होती. त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने साखरपुडाही उरकला होता. आता त्यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. 

अमृता आणि प्रसाद लवकरच विवाहबंधनात अडकत आहेत. सध्या अमृता आणि प्रसाद केळवणासाठी नातेवाईकांच्या घरी भेटी देत आहेत. नुकतंच देशमुख्यांच्या घरी अमृका आणि प्रसादचा केळवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. देशमुख कुटुंबीयांनी या नवीन जोडप्याचा अगदी थाटात पाहुणचार केला. केळवणासाठी अमृताने निळ्या रंगाची साडी नेसली होती. तर प्रसादने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. याचे फोटो अमृताने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. 

या केळवणाच्या वेळी अमृताने प्रसादसाठी खास उखाणाही घेतला. "चांदीच्या ताटात पुरणपोळी...पुरणपोळीमध्ये जायफळ...प्रसादचं नाव घेतेय देशमुखांचं शेंडेफळ !", असा स्पेशल उखाणा अमृताने घेतला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने हा उखाणा दिला आहे. अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

अमृता आणि प्रसादने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते सहभागी झाले होते. तिथेच त्यांच्यात प्रेमसंबंध खुलले. 'बिग बॉस'च्या घरातील हे कपल नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. 

टॅग्स :अमृता देशमुखमराठी अभिनेताटिव्ही कलाकार