Join us

"मला वाटायचं सूरजसोबत अत्याचार व्हायचा कारण..."; निक्की तांबोळीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:03 IST

निक्की तांबोळीने घराबाहेर आल्यावर सूरजविषयी मोठा खुलासा केलाय (nikki tamboli, suraj chavan)

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा विजेता झाला. सूरज चव्हाणला १४ लाख रुपये आणि इतर बक्षीसं मिळाली. सूरज चव्हाणचं निक्की तांबोळीसोबत खास नातं आपण सर्वांनी पाहिलं. आता घराबाहेर आल्यावर निक्की तांबोळीने एका मुलाखतीत सूरज चव्हाणविषयी मोठा खुलासा केलाय. निक्की मराठी टीव्ही मीडिया या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "मला असं वाटायचं सूरजसोबत अत्याचार व्हायचा कारण जे कोणी सेलिब्रिटी यायचे ते सूरजची तारीफ करायचे. माझं कौतुक करायचे. त्यामुळे बाकीच्यांनी निरीक्षण केलं होतं की हे लोक चर्चेत आहेत तर त्यांच्यासोबतच राहायचं."

मी सूरजसाठी उभी राहायची

निक्की पुढे म्हणाली, "या लोकांंचं सूरजसोबत एक नातंही होतं. त्यांनी सूरजला खूप सपोर्ट केला. त्यांनी सूरजला खूप समजावलं. आपलं माणूस म्हणून सूरजचा स्वीकार केला होता. पण मला कधीकधी हे खटकायचं. कारण जर माझी टोन त्यांना आवडायची नाही तर त्यांचीही सूरजसाठी तिच टोन होती ना! तिथे मी उभी राहिले कारण तो माझा भाऊ आहे. आणि तो जर भाऊ नसता तरीही मी बोलली असती. आम्ही सगळे एकाच घरात राहत असल्याने कोणावर अत्याचार होत असेल तर मी उभी राहायची. कारण मी जर काही चुकीचं केलं तर सगळे मला बोलायचे. त्यामुळे सूरज काय कोणासोबतही काही वाईट होत असेल डोळ्यांसमोर तर मी बोलणार."

 

सूरज विजेता झाल्याचा आनंद

निक्की पुढे म्हणाली, "मी त्याला राखी बांधली होती. मी खरंच सांगते, सूरजसाठी मी वेळोवेळी उभी राहिलीय. माझा त्याच्यासोबत छान बॉण्ड होता त्याच्यासोबत. जे तो घरच्यांसोबत नाही बोलायचा ते माझ्यासोबत बोलायचा. मस्ती करायचा तो. मी त्याच्यासमोर रडली पण आहे. मी खूप आनंदी आहे. कारण मी जर ट्रॉफी नाही उचलली तर बी ग्रुपमध्येच कोणीतरी ट्रॉफी उचलावी असं माझं म्हणणं होतं. अभिजीत असो किंवा सूरज असो. कोणीतरी बी ग्रुपमधून ट्रॉफी उचलली याचा मला आनंद आहे."

 

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठीटेलिव्हिजन