Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हिला पहिलं बाहेर काढा", 'बिग बॉस'च्या घरात येताच ट्रोल झाली कोकण हार्टेड गर्ल, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 09:53 IST

यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर सहभागी झाली आहे. पण, 'बिग बॉस'च्या घरात येताच नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.

Bigg Boss Marathi 5: टीव्हीवरील वादग्रस्त पण तितक्याच आवडीने पाहिला जाणार शो म्हणजे बिग बॉस. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाला अखेर सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर 'बिग बॉस मराठी ५'मधील स्पर्धकांच्या चेहऱ्यांवरुन रविवारी पडदा हटविण्यात आला आहे. यंदाच्या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर सहभागी झाली आहे. 

अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार याबाबत सुरुवातीपासून चर्चा रंगली होती. पण, 'बिग बॉस'च्या घरात येताच नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. कोकण हार्टेड गर्लने 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवरुन अंकितासाठी पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल केलं आहे. 

"हे कोकण विनाशी पार्सल घरी बसवा", "हिला पहिलं बाहेर काढणार", "कोकण हार्टेड गर्ल ❌ कोकण हेटेड गर्ल ✅", "कोकणातील साधीसुधी मुलगी म्हणून लोकांनी हिला डोक्यावर घेतले आणि आता ही टिपिकल सेलिब्रिटी नखरे करायला शिकली आहे. खूप oversmart झाली. सगळा innocence घालवून बसली..", अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं आहे.  

'बिग बॉस मराठी ५'चे स्पर्धक

वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकाररितेश देशमुख