Join us
Daily Top 2Weekly Top 5

विनर अभिजीतच असला पाहिजे! चाहतीचं 'बिग बॉस'ला पत्र, म्हणते- "सूरज हा लोकांच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:17 IST

पत्रातून चाहतीने 'बिग बॉस मराठी ५'चा विनर अभिजीत सावंतला बनवण्याची मागणी केली आहे. यासाठी चाहतीने बिग बॉस आणि कलर्स मराठी वाहिनीचे हेड केदार शिंदे यांना विनंती केली आहे. 

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. लवकरच बिग बॉस मराठीला नवा विजेता मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतने एन्ट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पहिल्या दिवसापासूनच अभिजीतने घरात त्याची जागा बनवायला सुरुवात केली होती. तल्लख बुद्धी आणि हुशारीने टास्क खेळणाऱ्या अभिजीतने चाहत्यांची मनंही जिंकून घेतली. आता अभिजीतच्या एका चाहतीने थेट बिग बॉसला पत्र लिहिलं आहे. 

या पत्रातून चाहतीने 'बिग बॉस मराठी ५'चा विनर अभिजीत सावंतला बनवण्याची मागणी केली आहे. यासाठी चाहतीने बिग बॉस आणि कलर्स मराठी वाहिनीचे हेड केदार शिंदे यांना विनंती केली आहे. 

अभिजीतच्या चाहतीचं बिग बॉसला पत्र 

आदरणीय, 

पत्रास कारण की, सूरजला जरी खूप वोट मिळाले तरी अभिजीतने खूप प्रामाणिकपणे, माणुसकी जपून, डिप्लोमॅटिक वे वापरुन असा मल्टिडायमेंशनल खेळ खेळला आहे. 

बिग बॉस मराठी ५ चा विनर अभिजीत असला पाहिजे. सूरज हा लोकांच्या हृदयातील विनर आहे. सूरज आणि अभिजीत दोघेही माणूस म्हणून चांगले आहेत. पण, अभिजीतने कर्तृत्वही सिद्ध केलं आहे. 

एकच विनंती आहे...यावेळेचा विनर अभिजीतच असला पाहिजे. सूरजसाठी तुम्ही एक वेगळा प्रोजेक्ट करू शकता. जिथे लोक ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करतील आणि त्यातून सूरजला त्याचं घर बांधण्यासाठी मदत होईल. पण, अभिजीतबरोबर कोणताही अन्याय होऊ देऊ नका, ही विनंती...

अभिजीतची एक फॉलोवर

अभिजीतच्या चाहतीचं हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. ६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वर्षा उसगावकर, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार यापैकी बिग बॉस मराठीची ट्रॉफी कोण नावावर करतं, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंतटिव्ही कलाकार