Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 4 : विश्वासघातकी मुलीशी मला नाही बोलायचं - किरण माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:23 IST

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात आज किरण मानेंचे या सदस्याशी वाद होताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन रंजक वळणावर आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच चार चॅलेंजर्सची एंट्री झाली आहे. त्यांच्या येण्यामुळे खेळात धम्माल आणली आणि घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली. आज घरात किरण माने आणि अमृता धोंगडे यांच्यात वाद होताना दिसणार आहे.

आज घरात अमृता धोंगडे विकासला विचारताना दिसणार आहे, विकास तू सांग.. विकासचे म्हणणे आहे दाद्याला येऊ दे... अमृता म्हणाली, तू होतास ना तिथे तू सांग कि मी कधी नाव घेतलं की आपण अक्षय, अपूर्वाला काढायचं. असं मला सहज सांगायचं... हो मी नावं घेतलेलं असं सांग. दाद्याच्या मागे करू नकोस. 

विकास म्हणाला, दाद्या बोला... किरण माने म्हणाले, विश्वासघातकी मुलीबरोबर मला बोलायचं नाही... दुतोंडी आणि विश्वासघातकी...  अमृता धोंगडे त्यावर म्हणाली, मला तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाशी बोलायचे नाही... खोटारडा माणूस एक नंबरचा. किरण माने म्हणाले, विश्वासघातकी पोरगी... असल्या पोरीशी काय बोलतो आहेस, मला नाही बोलायचं. अमृता म्हणाली, निघा मग. किरण माने यांनी बोलावताच विकास पण निघाला... त्यावर अमृता म्हणाली, तू पण जा हेच करत आला आहेस... पळपुटे...आता हा वाद नक्की का झाला ? कोणावरून झाला ? आणि का सुरु झाला ? हे आजच्या भागामध्ये कळेलच.  

टॅग्स :बिग बॉस मराठीअमृता धोंगडेकिरण माने