Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'नंतर सोनाली पाटील 'देवमाणसू 2' मध्ये?; अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:07 IST

Sonali patil: सोनाली पाटील ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून बिग बॉस मराठीमुळे तिला खरी ओळख मिळाली.

'वैजू नंबर १' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील (sonali patil). उत्तम अभिनयासोबतच आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे सोनालीने प्रेक्षकांची मनं जिंकली. इतकंच नाही तर तिच्या याच स्वभावामुळे ती 'बिग बॉस मराठी 3' या कार्यक्रमात सर्वात लक्षवेधी ठरली. 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम जरी संपला असला तरीदेखील सोनालीच्या नावाची चर्चा अजूनही प्रेक्षकांमध्ये रंगत आहे. यामध्येच आता 'देवमाणूस'मध्ये झळकलेली सोनाली पुन्हा 'देवमाणूस 2' मध्ये झळकणार का? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. त्यामुळे खुद्द सोनालीनेच या प्रश्नाचं उत्तर दिल्याचं सांगण्यात येत आहे. 

'देवमाणूस'  या मालिकेमध्ये सोनालीने आर्या देशमुख ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिला या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या भूमिकेविषयी तिने अलिकडेच एका मुलाखतीत तिची प्रतिक्रिया दिली आहे.

"मी बिग बॉसच्या घरात असताना मला माहितही नव्हतं की देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग सुरु झालाय. ज्यावेळी मला या मालिकेविषयी मला समजलं त्यावेळी मी श्वेता मॅडमना मेसेज करुन याविषयी विचारलंदेखील. तसंच इतर कलाकारांशीही माझं बोलणं झालं. त्यांनी व्हिडीओ कॉल करुन मला सेटदेखील दाखवला", असं सोनाली म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "जर मला संधी मिळाली तर नक्कीच देवमाणूस २ मध्ये मला पुन्हा एकदा आर्या देशमुखची भूमिका साकारायला आवडेल."

दरम्यान, सोनाली पाटील ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोनालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून बिग बॉस मराठीमुळे तिला खरी ओळख मिळाली. सोनाली 'वैजू नंबर १', 'देवमाणूस', 'जुळता जुळता जुळतंय की' या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार