Join us

Video: 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर थिरकली आयशा खान, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:46 IST

Ayesha Khan Dance on Shaky Song: मोरपंखी साडी, डिझायनर ब्लाऊज, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ या लूकमध्ये आयशा खानने व्हिडिओ शेअर केला आहे.

Ayesha Khan Shaky Song: संजू राठोडचं 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याची क्रेझ सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. आधी 'गुलाबी साडी' आणि आता 'एक नंबर तुझी कंबर'वर सेलिब्रिटीही डान्स करत आहेत. या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेत्री ईशा मालवीयने डान्स केला आहे. तर तिचीच बिग बॉसमधली मैत्रीण अभिनेत्री आयशा खाननेही (Ayesha Khan) आता या गाण्यावर रील बनवलं आहे.  आयेशा खानचा मराठमोळा लूक पाहून चाहते फिदा झालेत.

मोरपंखी साडी, डिझायनर ब्लाऊज, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ या लूकमध्ये आयेशा खानने व्हिडिओ शेअर केला आहे. 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याच्या ओळींवर ती हुबेहूब अभिनय करत आहे. आणि नंतर गाण्याची हूकस्टेप करताना दिसत आहे. आयेशाच्या या मराठमोळ्या लूकवरही चाहते फिदा झालेत. आयेशाने खूपच मनमोहकरित्या गाण्यावर डान्स केला आहे. 

आयेशाच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचं दिसणं, लाजणं, आणि डान्स सगळंच जमून आलं आहे. व्हिडिओतलं लोकेशनही सुंदर आहे. ईशा मालवीय आणि आयेशा बेस्ट फ्रेंड्स आहेत. आयेशा नुकतीच सनी देओलच्या 'जाट' सिनेमात दिसली. 'बिग बॉस १७'मधून आयेशा प्रसिद्धीझोतात आली होती. 'बालवीर रिटर्न्स' या मालिकेतून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. सध्या आयेशा हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे.तिने नुकताच सनी कौशलसोबतही एक प्रोजेक्ट केला. हा एक डिटेक्टिव्ह कॉमेडी प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये निम्रत कौर, मेधा शंकर यांचीही भूमिका आहे. पुढील वर्षी तो रिलीज होणार आहे. 

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीव्हायरल व्हिडिओसोशल मीडियाइन्स्टाग्राम