Join us  

'या' कारणामुळे कित्येक वर्ष रश्मी देसाईने धरला होता आईसोबत अबोला; 'Bigg boss'मुळे पुन्हा एकत्र आल्या मायलेकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 6:02 PM

Rashmi desai: कित्येक काळ रश्मी आणि तिची आई एकमेकींसोबत बोलत नव्हत्या. परंतु, बिग बॉसमुळे या मायलेकींमधील अंतर मिटलं.

हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई (rashmi desai). उत्तम अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत येणारी रश्मी अनेकदा तिच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते. उतरनसह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेल्या रश्मीने बिग बॉस१३ आणि १५ या दोन्ही पर्वांमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी बिग बॉसच्या घरात असताना तिने तिच्या वैयक्तिक जीवनाविषयी अनेक खुलासा केला. त्यातलाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. लोकप्रियतेचं शिखर गाठणारी रश्मी एकेकाळी आपल्या आईशी बोलत नव्हती. बिग बॉस हा शो संपल्यानंतर तिने एका मुलाखतीत आईसोबत अबोला धरल्याचा खुलासा केला आहे.

'अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत रश्मीने तिच्या घटस्फोटाविषयी, बॉयफ्रेंडने केलेली फसवणूक आणि आईसोबत धरलेला अबोला या सगळ्यांविषयी भाष्य केलं आहे. यात कित्येक काळ रश्मी आणि तिची आई एकमेकींसोबत बोलत नव्हत्या. परंतु, बिग बॉसमुळे या मायलेकींमधील अंतर मिटलं.

"माझ्या आणि आईच्या नात्यात खूप चढउतार आले. आमचं नातं सरळ नव्हतं त्यात खूप अडचणी होत्या. एक काळ असा होता ज्यावेळी आमच्यातील संवाद पूर्णपणे बंद झाला होता. आमच्या नात्यात जनरेशन गॅप निर्माण झाली होती", असं रश्मी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझी काळजी घेणारं कोणती तरी माझ्या आयुष्यात असावं असं मला कायम वाटायचं. मी घरात सगळ्यात मोठी मुलगी, त्यात अभिनेत्री त्यामुळे माझ्यावर कायम जबाबदारीचं ओझं होतं आणि हे ओझं मला खांद्यावर घेऊन चालावं लागत होतं. या जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या होत्या. पण, बिग बॉसमुळे मला सगळं काही मिळालं. माझं कुटुंब माझ्यावर प्रेम करतंय, मला पाठिंबा देतंय हे या बिग बॉसच्या घरात आल्यावर मला समजलं. तेव्हापासून आमच्या नात्यात खूप सुधारणा झाली."

दरम्यान, बिग बॉस १३ मध्ये झळकलेली रश्मी अलिकडेच बिग बॉस १५ मध्येही पाहायला मिळाली. रश्मीने या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. रश्मी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रश्मी उतरन, 'दिल से दिल तक', 'इश्क का रंग सफेद', 'अधुरी कहानी हमारी', 'नच बलिए 7' आणि 'खतरों के खिलाडी 6' या कार्यक्रमांमध्ये झळकली आहे. 

टॅग्स :रश्मी देसाईटेलिव्हिजनटिव्ही कलाकार