Join us

Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 09:52 IST

अमिताभ बच्चन, मिथून, गोविंदा, शाहरुख खान या सर्वांसोबत तिने काम केलं आहे. तुम्ही ओळखलंत का?

बिग बॉस १८ ला येत्या रविवारपासून धमाकेदार सुरुवात होणार आहे. भाईजान सलमान खान शो होस्ट करणार आहे. यावेळी 'टाईम का तांडव' अशी थीमही ठेवण्यात आली आहे. निया शर्मा, गुरुचरण सिंह यांची नावं कन्फर्म झाली आहेत. त्यातच एका बॉलिवूड सुंदरीचंही नाव कन्फर्म आहे. कलर्सने नुकताच तिचा प्रोमो शेअर केला आहे.

कलर्स वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये ती अभिनेत्री म्हणते, 'मला सगळे ९० च्या दशकातील सेन्शेनशनल क्वीन म्हणायचे, बोल्ड अभिनेत्री. मी सर्व मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. अमिताभ बच्चन, मिथून, गोविंदा, शाहरुख खान या सर्वांसोबत काम केलं आहे. एकच स्वप्न होतं सलमान खानसोबत काम करायचं. आता तेही पूर्ण होत आहे." ओळखलंत का या अभिनेत्रीला?

तर ही अभिनेत्री आहे शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar).प्रोमोमध्ये तिचा चेहरा दाखवला नसला तरी तिची स्माईल, आवाज आणि तिच्या हातावरचा टॅटू यावरुन ही शिल्पाच असल्याचं कन्फर्म झालं आहे. प्रेक्षकांनी कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

शिल्पा शिरोडकरच्या करिअरविषयी सांगायचं तर तिने 'आँखे', 'गोपी किशन', 'खुदा गवाह', 'हम'  यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेतही भूमिका साकारली आहे. आता तिला बिग बॉसमध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :बिग बॉसशिल्पा शिरोडकरसलमान खानबॉलिवूडटेलिव्हिजन