Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17: अंकिता लोखंडेला धक्का, लवकरच घरातून बाहेर? 'हे' असतील टॉप 3 स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:52 IST

अंकितावर प्रेक्षक नाराज?

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) च्या फिनालेला आता काहीच दिवस राहिले आहेत. 28  जानेवारीला संध्याकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ग्रँड फिनाले रंगणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच मनातील धाकधुक वाढली आहे. सध्या घरात टॉप ५ सदस्य राहिले आहेत. यामध्ये अंकिता लोखंडे, मुन्नावर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांचा समावेश आहे. आता बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या पाच स्पर्धकांमधून टॉप ३ स्पर्धक कोण असतील याचा अंदाजही लावण्यात येतोय. यामध्ये अंकिता (Ankita Lokhande) लोखंडे टॉप 3 (Top 3) मध्ये नसेल अशी शक्यता आहे. 

कलर्स टीव्ही च्या मेकर्सकडून एक ट्वीट करण्यात आलं. यामध्ये कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल असा प्रश्न विचारण्यात आला आणि सोबत तीन ऑप्शन देण्यात आले. या पर्यायांमध्ये मुन्नावर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार या तीन नावांचा समावेश आहे. या ट्वीटनंतर अंकिता 'टॉप 3' पर्यंत मजल मारु शकणार नाही अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. पाच सदस्यांपैकी कोण दोघं बाहेर जाणार आणि कोण टॉप 3 पर्यंत पोहोचणार हे आता रविवारीच स्पष्ट होईल. मात्र सध्या अंकितावर प्रेक्षक खूप नाराज आहेत. विकीसोबतची भांडणं, ड्रामा, सतत सुशांतसिंहचं नाव घेऊन सहानुभूती घेणे या ना त्या कारणामुळे अंकिताने प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली आहे. अंकिता ट्रॉफी जिंकायच्या योग्य नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तिची क्रेझ गेल्या काही दिवसांमध्ये कमी झालेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे मुन्नावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. 

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटिव्ही कलाकारसोशल मीडिया