Join us

बिग बॉस मराठी २ : माजी स्पर्धक आस्ताद काळेने ह्या स्पर्धकाला दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 18:11 IST

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात 'सरस्वती' मालिकेतला ‘राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे सहभागी झाला होता.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात 'सरस्वती' मालिकेतला ‘राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे दिसला तर आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात या मालिकेतला राघवचा लहान भाऊ कान्हा म्हणजेच अभिनेता माधव देवचके दिसून येत आहे. 

मालिकेत जसे राघव-कान्हाचे एकमेकांवर निस्सीम प्रेम होते. तसेच आस्ताद काळेचे ही माधव देवचकेवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम आस्तादने सोशल मीडियावरून नुकतेच दाखवले. आस्तादने त्याचा आणि माधवचा एक फोटो टाकून त्याखाली लिहीले आहे, ''हा असाच आहे...आयुष्यातल्या अनेक गोष्टींची कमाल क्लॅरीटी आहे याला...जीवाला जीव लावतो...म्हणूनच जवळच्याच काही चुकले तर हक्कानी खूप ओरडतोसुद्धा....सगळ्यांचा लाडका कान्हा...आमचा लाडका माध्या, मॅडी....भीड गड्या....''

आस्ताद काळेशी ह्याविषयी संपर्क साधल्यावर तो म्हणतो, “मालिकेमुळे माझे माधवशी आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळले. तो मला माझ्या सख्या भावासारखा आहे. माधव उत्तम क्रिकेटर असल्याने त्याच्यात स्पोर्टमॅन स्पिरीट आहे. त्यामूळे तो टास्कमध्येही चांगला खेळेल, असा मला विश्वास आहे.”

आस्ताद काळेप्रमाणेच मालिका आणि सिनेसृष्टीतले अनेक कलाकार सध्या माधवला सपोर्ट करत आहेत.बिग बॉस म्हटला की, या घरात काही जण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनतात तर काही जण एकमेकांचे चेहरे पाहायला देखील तयार नसतात. बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमातील टीम सदस्यांच्या भांडणामुळेच हा कार्यक्रम चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात बनले जाणारे ग्रुप हे तर बिग बॉसचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे आता सध्या घरात वादविवाद, रागवणी फुगवणी व ग्रुप पहायला मिळत आहेत. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमाधव देवचक्केअस्ताद काळे