Join us

बिग बींनी अचानक सेटवर सुरू केली रेकॉर्डिंग; जया यांचा चेहरा पाहून चाहते हैराण, थेट विचारला ‘हा’ मोठा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 19:14 IST

अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबतचा सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अमिताभ आणि जया बच्चन  ही बॉलिवूडची परफेक्ट जोडी आहे. आता अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबतचा सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते दररोज त्याच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.  अमिताभ बच्चन सोशल मीडियावर जितके जास्त सक्रिय असतात तितकचं त्यांच्या पत्नी जया बच्चन या सोशल मीडियापासून दूर राहतात. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत ते जया बच्चन यांच्या नकळत व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत.

 व्हिडिओमध्ये, अमिताभ बच्चन अचानक स्लो-मो फिल्टर वापरून त्यांचा कॅमेरा जया बच्चन यांच्याकडे पॅन करतात. अचानक आपल्याकडे वळलेल्या कॅमेराकडे पाहून जया बच्चन एक गोड स्माईल देतात. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. 

जया बच्चन यांचे नेहमीच मीडियावर रागावल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ज्यामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं. अशा परिस्थितीत बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांना हसताना पाहिल्यावर एका युजरने म्हटले की, "मला खूप धक्का बसला. कारण जया जी हसत आहेत". तर दुसऱ्या एका युजरने म्हटले,  "तुमची बायको क्वचितच हसते. आज तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली". तर आणखी एका युजरने म्हटले, "सर, हा व्हिडिओ काढल्यानंतर तुमच्यावर त्या चिडल्या तर नाहीत ना". 

अमिताभ आणि जया 3 जून 1973 रोजी लग्नबंधनात अडकले. आता पुढल्या वर्षी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.  अनेक दशकं गाजवलेले अमिताभ बच्चन आणि जया बच्चन आजही वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनबॉलिवूड