Join us
Daily Top 2Weekly Top 5

घट्ट बांधलेले दोरे, बंद दरवाजा अन्...; अखेर 'भूल भूलैय्या ३'ची घोषणा, या दिवशी होणार सिनेमा रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:28 IST

कार्तिक आर्यनच्या आगामी 'भूल भूलैय्या ३'ची अधिकृत घोषणा करण्यात आलीय (bhool bhoolaiyya 3)

कार्तिक आर्यनच्या आगामी 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला होती. गेल्या अनेक महिन्यांपासून 'भूल भूलैय्या ३'बद्दल विविध अपडेट्स समोर येत होते. 'भूल भूलैय्या ३'च्या तिसऱ्या भागामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरीची वर्णी लागली. याशिवाय 'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागात झळकलेली विद्या बालन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार असल्याने चाहत्यांना चांगलाच आनंद झालाय. अशातच 'भूल भूलैय्या ३'ची आज अधिकृत घोषणा करण्यात आली असून पहिली झलक दाखवण्यात आलीय.

'भूल भूलैय्या ३'चं पहिलं पोस्टर समोर

कार्तिक आर्यन आणि 'भूल भूलैय्या ३'च्या टीमने सिनेमाचं अधिकृत पहिलं पोस्टर रिलीज केलंय. यामध्ये एक दरवाजा दिसत असून त्याबाहेर आवळून घट्ट बांधलेले गंडेदोरे आणि मोठं कुलुप दिसत आहे. त्या दरवाजावर ३ हा आकडा लिहिलेला दिसतोय. अशाप्रकारे 'भूल भूलैय्या ३'ची घोषणा करण्यात आली आहे. दरवाजा खुलेगा.. इस दिवाली असं कॅप्शन या फोटोवर लिहिलेलं दिसत आहे. अशाप्रकारे 'भूल भूलैय्या ३' यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे.

 

'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'मध्ये टक्कर

'भूल भूलैय्या ३' दिवाळीमध्ये रिलीज होणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय. यामुळे 'भूल भूलैय्या ३'ची टक्कर आता रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'सोबत होणार आहे. रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन'च्या माध्यमातून एक संपूर्ण पोलिस विश्व निर्माण केले आहे. 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर हे देखील या पोलीस विश्वाचा एक भाग असतील. आता दिवाळीत एकत्र रिलीज झाल्याने 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' या दोन्ही सिनेमांना कसा प्रतिसाद मिळतोय, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :भूल भुलैय्याकार्तिक आर्यनविद्या बालनतृप्ती डिमरी