Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंजुलिका अन् रुह बाबाची एन्ट्री! 'भूलभूलैय्या 3' मधील कार्तिक-विद्याचा लूक पाहून चाहत्यांच्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:53 IST

विद्या बालन 'मंजुलिका'च्या रुपात कमबॅक करत आहे.

कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या आगामी 'भूलभूलैय्या 3' (Bhool Bhulaiyaa 3) सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. सिनेमात ओरिजिनल मंजुलिका विद्या बालनही कमबॅक करत आहे. तसंच तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षितही मुख्य भूमिकेत आहेत. या हॉरर कॉमेडी सिनेमाचं नुकतंच पोस्टर शूट झालं. यातील विद्या बालनचा लूक समोर आला आहे. भूलभूलैय्या 3 ची चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अनिस बज्मी दिग्दर्शित 'भूलभूलैय्या' या सिनेमातून अक्षय कुमारने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. मात्र पुढच्या पार्टमध्ये कार्तिकची एन्ट्री झाली. तर आता तिसऱ्या भागातही कार्तिक लीड रोलमध्ये आहे. तीन महिन्यांनी भूलभूलैय्या 3 रिलीज होणार आहे. सिनेमाचा एक BTS शॉट समोर आला आहे. यामध्ये विद्या बालन काळ्या साडीत दिसत आहे. तर कार्तिक त्याच्या रुह बाबा अवतारात दिसतोय. दोघंही सिनेमाच्या पोस्टर शूटसाठी जात होते तेव्हा कॅमेऱ्यात कैद झाले. 

कार्तिक आणि विद्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'मंजुलिका इज बॅक','२०२२ मध्ये कार्तिकने बॉलिवूडला पुन्हा वर आणलं होतं आता २०२४ मध्ये तो नेक्स्ट लेवल असणार आहे' असं म्हणत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. शिवाय सिनेमात कार्तिक आणि तृप्ती डिमरीची फ्रेश जोडी दिसणार आहे. आता हा सिनेमा स्त्री २ चा रेकॉर्ड मोडतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनविद्या बालनबॉलिवूडभूल भुलैय्या