Join us
Daily Top 2Weekly Top 5

थिएटरमध्ये सुपरहिट ठरलेला 'भूल भूलैय्या 3' आता पाहा घरबसल्या! या दिवशी, या OTT वर होतोय रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:23 IST

'भूल भूलैय्या 3' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार असून या तारखेपासून सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे (bhool bhulaiyya 3)

 'भूल भूलैय्या 3' सिनेमा दिवाळीत रिलीज झाला. समोर 'सिंघम अगेन'चं तगडं आव्हान असूनही 'भूल भूलैय्या 3' वरचढ निघाला. कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षितच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींहून अधिकची कमाई केली. 'भूल भूलैय्या 3' सिनेमातील गाणी आणि कथा प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस निघाली.  'भूल भूलैय्या 3' ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांना आता हा सिनेमा घरबसल्या पाहायची संधी मिळणार आहे. कारण  'भूल भूलैय्या 3' ओटीटीवर रिलीज होतोय. (bhool bhulaiyya 3)

 'भूल भूलैय्या 3' या ओटीटीवर होणार रिलीज 

'भूल भूलैय्या 3'च्या ओटीटी रिलीजबद्दल सांगायचं झालं तर,  हा सिनेमा २७ डिसेंबरला ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रेक्षकांचा मनोरंजनाची पर्वणी मिळणार यात शंका नाही. अजूनही हा सिनेमा काही थिएटरमध्ये सुरु आहे. परंतु नुकतंच 'पुष्पा 2' हा बहुचर्चित सिनेमा रिलीज झाल्याने 'भूल भूलैय्या 3' काही थिएटरमधून उतरवण्यात आला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये हा हॉरर कॉमेडी सिनेमा ज्यांना पाहता आला नाही, त्यांना आता घरबसल्या 'भूल भूलैय्या 3'चा आनंद मिळणार आहे.

'भूल भूलैय्या 3' बद्दल थोडंसं

अनीस बाझमी दिग्दर्शित 'भूल भूलैय्या 3' सिनेमा दिवाळीत रिलीज झाला. या सिनेमासमोर मल्टिस्टारर 'सिंघम अगेन'चं तगडं आव्हान होतं. परंतु तरीही वेगळ्या कथानकामुळे कमाईच्या बाबतीत 'भूल भूलैय्या 3'ने बाजी मारली. या सिनेमात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, विद्या बालन, संजय मिश्रा, राजपाल यादव, विजय राज, अश्विनी काळसेकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या बघायला मिळेल.

टॅग्स :कार्तिक आर्यनतृप्ती डिमरीविद्या बालनराजपाल यादवमाधुरी दिक्षित