Join us

भारती सिंहच्या बाळाचा पहिला व्हिडीओ आला समोर; पहिल्यांदाच एकत्र दिसलं लिंबाचिया कुटुंबीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:05 IST

Bharti singh:शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये भारती आणि हर्ष त्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन घरी जाताना दिसत आहे.

आपल्या विनोद बिद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी लाफ्टर क्वीन म्हणजे भारती सिंग (bharti singh). अलिकडेच भारतीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.  भारतीच्या बाळाची एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर झाले आहेत. यामध्येच आता विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर भारतीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये भारती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी जाताना दिसत आहे.

शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये भारती आणि हर्ष त्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन घरी जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ हॉस्पिटल बाहेरचा असून भारती आनंदात दिसत असून तिच्या चेहऱ्यावर थोडासा थकवादेखील जाणवून येत आहे.

या व्हिडीओमध्ये भारतीच्या बाळाचा चेहरा दिसत नसला तरीदेखील हर्षने त्याला उत्तमरित्या कॅरी केलं आहे. तसंच येत्या काळात लवकरच भारती बाळाचा चेहरा दाखवेल आणि याविषयी भाष्य करेल असंही तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं.

दरम्यान, भारती सिंग प्रेग्नंसीच्या काळात जवळपास ८- ९ महिन्यांपर्यंत काम करत होती. त्यामुळे तिने केलेल्या हार्डवर्कचीदेखील मध्यंतरी चर्चा रंगली होती. सध्या बाळाच्या जन्मामुळे भारतीने हुनरबाज शोमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे तिच्या जागी हा शो अभिनेत्री सुरभी चंदना करणार असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :भारती सिंगटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी