Join us

Pathaan Song: कॉन्ट्रोव्हर्सीमुळे नाही तर 'या' कारणामुळे हिट झालं 'बेशरम रंग' हे गाणं; गायिकेने स्पष्टच सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 17:48 IST

Pathaan Besharam Rang Song: दीपिका आणि शाहरुखवर चित्रित झालेलं 'बेशरम रंग' हे गाणं शिल्पा रावनं गायलं आहे. आता तिने हे गाणं हिट का झालं, याचं कारण सांगितलं आहे.

'पठाण' (Pathaan) या सिनेमात फक्त दोन गाणी आहेत.  एक 'बेशरम रंग' आणि दुसरं  'झूमे जो पठान..'.  यापैकी 'बेशरम रंग' (Besharam Rang ) हे  पहिलं गाणं रिलीज झालं आणि रिलीज होताच या गाण्यानं वाद ओढवून घेतला. या वादानं देशातील वातावरण ढवळून निघालं. कारण होतं, गाण्यात दीपिकानं (Deepika Padukone Song) घातलेली भगव्या रंगाची बिकिनी. दीपिकानं भगव्या रंगाची बिकिनी घालून हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप झाला. हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या. या वादाच्या पार्श्वभूमीवर पठाणवर बहिष्कार घालण्याची मागणी केली गेली.  बॉयकॉट पठाणही ट्रेंड होऊ लागले. पण प्रत्यक्षात काय तर या वादाचा गाण्याला मात्र फायदाच झाला. 

'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झालं आणि गाण्याच्या व्हिडिओने 199 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला. सर्वात आवडीच्या गाण्यांमध्ये हे गाणं नंबर १ ठरलं. आता हे गाणं गाणारी बॉलिवूड सिंगर शिल्पा राव हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'बेशरम रंग' हे गाणं इतकं हिट का झालं? याचं कारण तिने सांगितलं आहे.

काय म्हणाली शिल्पा राव?हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा राव 'बेशरम रंग' या गाण्यावर बोलली. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं याचं कारण दीपिका व शाहरूखची केमिस्ट्री आहे. खुद्द दीपिकाने हे गाणं एन्जॉय केलं आणि म्हणून ते प्रेक्षकांना अपील झालं. तिच्यामुळेच गाण्यात जास्त जोश भरला गेला. माझं आतादेखील हेच म्हणणं आहे की हे गाणं जसं आहे तसं सर्वोत्तम आहे. गाण्यात मेलडी आहे,याचे शब्द खूप अर्थपूर्ण आहेत.  मला वाटतं हे गाणं अधिक प्रसिद्ध झालं कारण लोकांना गाण्याचा खरा अर्थ कळला आहे. तुम्ही जसे आहात तसं स्वतःला स्वीकारा, स्वतःवर प्रेम करा..कुणालाही स्वतःविषयी स्पष्टिकरण देत बसू नका.., हे हे गाणं आपल्याला सांगतं. लोकांना हे कळलं आणि म्हणूनच त्यांनी गाण्याला पॉप्युलर केलं, असं ती म्हणाली.१२ डिसेंबर २०२२ रोजी 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झालं होतं. यात दीपिकाचा बोल्ड लुक पाहायला मिळतो.

टॅग्स :पठाण सिनेमादीपिका पादुकोणशाहरुख खानबॉलिवूड