Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मैं हू ना' मध्ये लक्ष्मणच्या भूमिकेसाठी 'या' तीन अभिनेत्यांना होती पसंती; 'अशी' मिळाली जायेद खानला भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:28 IST

जायेद खान नव्हता 'मैं हूँ ना' साठी पहिली पसंती, 'या' लोकप्रिय नायकांना मिळालेली ऑफर, पण...

Zayed Khan: शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला 'मैं हूँ ना' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात  शाहरुख खानसह विश्वसुंदरी सुश्मिता सेन, अमृता राव, सुनील शेट्टी आणि जायद खानसारखे तगडे कलाकार झळकले. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला. ॲक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि संगीत या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ साधणं हेच 'मै हूँ ना' चित्रपटाचं सर्वात मोठं यश होतं. याच चित्रपटाच्या माध्यमातून फराह खानने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या चित्रपटातील कास्टिंगबाबत अभिनेता जायेद खानने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 

'मैं हॅूं ना' या चित्रपटाप्रमाणे त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटात शाहरुखने राम नावाचं पात्र साकारलं होतं. त्याच्या धाकटा भाऊ लक्ष्मणच्या भूमिकेत जायेद खान दिसला होता.  जायेद खानच्या म्हणण्यानुसार, त्याच्या सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये जायेद खानने मै हू ना मधील त्याच्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला. त्यावेळी बोलताना अभिनेता म्हणाला, भूमिकेसाठी पहिल्यांदा हृतिक रोशन, अभिषेक बच्चन आणि सोहेल खान सारख्या कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. परंतु, काही काराणांमुळे त्यांनी नकार दिला. 

त्यानंतर अभिनेत्याने म्हटलं, "एके दिवशी मी फराह खानला फोन केला कारण मला एका गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी तिची मदत हवी होती. ज्याचे मी त्या दिवसांत शूटिंग करत होतो. त्यावेळी मी बोलण्याआधीच फराह खानने मला ही भूमिका ऑफर केली. मी लगेचच हो म्हटलं." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

टॅग्स :जायेद खानशाहरुख खानबॉलिवूडसिनेमा