Join us

अक्षय खन्नाआधी 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ऑफर झालेली 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:48 IST

'छावा' सिनेमातील अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका आधी एका वेगळ्या अभिनेत्याला ऑफर झालेली (chhaava)

सध्या 'छावा' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसत आहे. या सिनेमातील एका अभिनेत्याची चर्चा आहे तो म्हणजे अक्षय खन्ना.अक्षय खन्ना सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. अक्षयआधी ही भूमिका एका वेगळ्या अभिनेत्याला ऑफर झालेली. कोण होता हा लोकप्रिय अभिनेता? जाणून घ्या.

हा अभिनेता साकारणार होता औरंगजेब पण...

'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका याआधी अनिल कपूर यांना ऑफर झाली होती. हो तुम्ही बरोबर ऐकताय. अक्षयआधी अनिल कपूर  'छावा' सिनेमात भूमिका औरंगजेबाची भूमिका साकारणार होते. त्याविषयी प्राथमिक बोलणीही सुरु होती. परंतु नंतर मात्र बोलणं कुठे फिस्कटलं याविषयी माहिती उपलब्ध नाही. नंतर अक्षय खन्नाला  'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका ऑफर झाली. अक्षयने ही भूमिका साकारायला होकार दिला. 

अक्षयचा ओळखू न येणारा लूक

२२ जानेवारीला  'छावा'चा ट्रेलर लाँच येण्यापूर्वी सिनेमातील अक्षय खन्नाचा लूक व्हायरल झाला. या लूकमध्ये अक्षय खन्ना अजिबात ओळखू येत नाहीये. इतकंच नव्हे तर  'छावा'चा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला त्यामध्येही अक्षयचा खूंखार लूक चाहत्यांचं लक्ष वेधतोय. अक्षय पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित  'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला भेटीला येणार आहे.

टॅग्स :विकी कौशलरश्मिका मंदानाअनिल कपूरअक्षय खन्ना