सध्या अमेरिकन गायक निक जोनास आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली आहे. इतकेच काय तर दोघांच्या लग्नाचीही चर्चा होत आहे. पण यात किती तथ्य आहे हे अधिकृतपणे काही कळाले नाहीये. कारण प्रियंकाने दोघांच्या नात्याला केवळ मैत्रीचं नाव दिलंय. अशात आता निक जोनासच्या एक्स गर्लफ्रेन्डची चर्चा होत आहे. निकचं याआधी तब्बल सात मुलींसोबत अफेअर होतं. चला जाणून घेऊ निकच्या एक्स गर्लफ्रेन्डविषयी....
मिले सायरस
मिले सायरससोबत निकची भेट तो 13 वर्षांचा असताना झाली होती. 2006 मध्ये डिस्नी चॅनलच्या एका इव्हेंटमध्ये त्यांची भेट झाली होती. त्यानंतर एकाच वर्षात म्हणजे 2007 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.
सेलेना गोम्स
2008 मध्ये आलेल्या 'बर्निंग अप' या गाण्यात निक आणि सेलेना एकत्र दिसले होते. यानंतर दोघांच्या अफेअरला सुरुवात झाली होती. पण निकचं हेही अफेअर केवळ एक वर्ष टिकलं.
जॉर्जिया फॉलर
जॉर्जिया फॉलर आणि निक जोनस यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा झाली होती. पण यूएस विकलीच्या एका रिपोर्टनुसार, दोघे केवळ कॅज्यूअल डेट करत होते.
लिली कॉलिन्स
लिली कॉलिन्स आणि निकचं अफेअरही चर्चेत होतं. यावेळी लिली फारच लोकप्रिय झाली होती. 2009 मध्ये दोघांची भेट झाली होती. पण दोघांनीही कधीच आपलं अफेअर असल्याचं कबूल केलं नाही.
ओलविया कल्पो
निक जोनस आणि ओलविया कल्पो दोघेही एकमेकांना 2013 मध्ये डेट करत होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
केट हडसन
केट हडसन आणि निक जोनस यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली कारण केट ही त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी होती. एका मुलाखतीतही तिच्या प्रेमाविषयी त्याने वक्तव्य केलं होतं.
डेल्टा गुडरेम
ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुडरेम आणि निकचं अफेअर साधारण 2 वर्ष चाललं. डेल्टा ही सुद्धा निकपेक्षा 8 वर्षांनी मोठी होती.