Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशिष विद्यार्थींची दुसऱ्या पत्नीशी ओळख नेमकी कशी झाली ? लग्नापर्यंत कसं गेलं प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 11:22 IST

आशिष विद्यार्थी नेहमी त्यांच्या फुड ब्लॉग्समुळे चर्चेत असतात.

बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi)  यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 50 वर्षीय रुपाली बरुआ हिच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. रुपाली या आसामच्या आहेत. मग या दोघांची नेमकी भेट कशी झाली आणि ते प्रेमात कसे पडले या प्रश्नांची उत्तरं आशिष विद्यार्थी यांनी एका मुलाखतीत दिली आहेत.

आशिष विद्यार्थी नेहमी त्यांच्या फुड ब्लॉग्समुळे चर्चेत असतात. भारतात विविध ठिकाणी फिरण्याचा आनंद घेत ते तिथल्या प्रसिद्ध खाण्यापिण्याच्या गोष्टी दाखवत व्हिडिओ ब्लॉग करतात. त्यांची आणि रुपालीची भेट कशी झाली यावर ते म्हणाले, "मी रुपालीला मागच्या वर्षी एका माझ्या फूड ब्लॉंगवेळीच पहिल्यांदा भेटलो होतो. त्यानंतर आमची ओळख झाली, सतत बोलायला गेलो, एकमेकांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतलं. तेव्हा मला कळालं की रुपालीने तिच्या आयुष्यात खूप सहन केलं आहे."

ते पुढे म्हणाले, "पाच वर्षांपूर्वी रुपालीच्या पहिल्या पतीचं निधन झालं. तिने एकटीने लेकीचा सांभाळ केला. दुसऱ्या लग्नाचा कधी विचारही केला नाही. आमची ओळख झाली आणि आम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी वाटायला लागली. आम्ही मनाने एकमेकांच्या जवळ आलो. माझाही घटस्फोट झाल्याने मी आणि रुपालीने लग्नाचा विचार करायला हरकत नाही असं म्हणत अखेर विवाहबंधनात अडकलो."

राजोशी उर्फ पिलू ही आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी आहे. दोघांनी २३ वर्षांचा मुलगा आहे. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. भविष्याकडे पाहण्याचा दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा होता म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. 

टॅग्स :आशिष विद्यार्थीलग्नबॉलिवूड