Join us

Arya Babbar: '...तुम्हाला तो अधिकार नाही', राज बब्बर यांच्या मुलाचा पायलटसोबत वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:13 IST

Arya Babbar: अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर याचा पायलटसोबत वाद झाल्याचा प्रकार उघडीस आला आहे.

नवी दिल्ली: अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर याचा वैमानिकाशी(पायलट) वाद झाल्याचा प्रकार उघडीस आला आहे. आर्यने स्वतः याबाबतचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एका जोकमुळे आर्य आणि पायलटचा वाद झाल्याचे दिसत आहे. पायलटने आर्यवर टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. 

आर्य बब्बरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याची आणि विमानाच्या पायलटमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे त्यात दिसत आहे. वैमानिक विमानात येताच आर्य बब्बरने त्याच्यावर जोक केल्याचा वैमानिकाचा आरोप आहे. तर, मित्रासोबत बोलताना जोक केला असून, वैमानिकावर जोक केला नसल्याचे आर्यचे म्हणणे आहे. 

पायलटने आर्यला कॉकपिटमध्ये बोलावून जोक केल्याबाबत विचारणा केली. त्यावर आर्य म्हणतो की, मी माझ्या मित्रासोबत मस्करी करत होतो, तुमच्यावर जोक केला नाही. यादरम्यान, दोघांमध्ये जोरदार वादावादी होते. आर्य म्हणतो की, जोक करणे चुकीचे आहे का, त्यावर पायलट म्हणतो, आमच्यावर जोक करू नका. यावर आर्य म्हणतो की, तुम्ही तुमच्या पदाची पॉवर वापरत आहात, हे योग्य नाही. मला जोक करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. बराच वेळ वाद झाल्यानंतर आर्य त्याच्या जागेवर जाऊन बसतो. ही संपूर्ण घटना आर्यने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

टॅग्स :विमानराज बब्बरबॉलिवूड