Join us

मराठी अभिनेत्याचे नवीन घर, पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 14:01 IST

मराठी अभिनेत्याने पुण्यात एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे. 

Aroh Welankar : अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवलेला अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर ( Aroh Welankar ).  त्याने आतापर्यंत अनेक सिनेमा, शोमध्ये काम केलं आहे. आरोह वेलणकर सध्या चर्चेत आहेत. आरोह वेलणकर याने पुण्यात एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे. 

आरोहने पुण्यात 'Sage Villa' या प्रोजेक्टमध्ये एक व्हिला बूक केला आहे. याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "नवीन हँगआउट स्पॉटला ‘हॅलो’ म्हणा…". असं  कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं. नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळींनी आरोहचे अभिनंदन केलं आहे. 

आरोह हा 'फनरल', 'रेगे', 'हॉस्टेल डेज' यांसारख्या सिनेमांमध्ये झळकला आहे. तर, 'लाडाची मी लेक गं' यांसारख्या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. अलिकडेच आरोहने बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. त्याने 'चंदू चॅम्पियन' सिनेमात कार्तिकबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. आरोहला बाइक रायडिंग आणि भटकंती करायची प्रचंड आवड आहे. त्यामुळे तो कायम वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतो. 

टॅग्स :आरोह वेलणकरसेलिब्रिटीपुणे